Share

परप्रांतीय व्यक्तींसाठी रेल्वेची सुविधा पुणे विभागातून 68 हजार 553 प्रवासी रेल्वेने रवाना

Published On: 

पुणे : पुणे विभागातून परप्रांतीयांसाठी 17 मे पर्यंत एकुण 53 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेशासाठी -15, उत्तरप्रदेशासाठी -24 उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1, राजस्थानसाठी – 5, बिहारसाठी – 6 व हिमाचल प्रदेशसाठी 1 अशा एकुण 53 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 68 हजार 563 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

18 मे रोजी पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 1, उत्तरप्रदेशसाठी एकुण 3, तसेच तमिळनाडू, बिहार, झारंखड, छत्तीसगड राज्यांसाठी प्रत्येकी 1, अशा एकूण 8 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकुण 10 हजार 955 प्रवासी अपेक्षीत आहेत. यापैकी पुणे स्थानकावरुन उत्तरप्रदेश, तमिळनाडू, बिहार, झारंखड व छत्तीसगड यांच्यासाठी प्रत्येकी एक रेल्वे 6 हजार 984 प्रवाश्यांसह नियोजित आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 96 हजारांच्या वर,महाराष्ट्रात भीषण परिस्थिती

सांगली रेल्वे स्थानकावरुन मध्य प्रदेशसाठी 1 हजार 59 प्रवाश्यांसह 1 रेल्वेगाडी नियोजीत आहे. कोल्हापूर स्थानकावरुन उत्तरप्रदेशसाठी 2 हजार 912 प्रवाशांसह 2 रेल्वेगाडया नियोजित आहेत, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अखेर पोहचले घरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!