Share

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 96 हजारांच्या वर,महाराष्ट्रात भीषण परिस्थिती

Published On: 

नवी दिल्ली : भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही वाढून ३ हजार २९ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे करोनाग्रस्तांची जगभरातील संख्यादेखील ४७ लाखांवर पोहोचली आहे. तर मृतांच्या संख्येनंही ३ लाख १५ हजारांचा आकडा पार केला आहे.

सध्या देशात 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथील रूग्णांची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 1198 वर पोचली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 379 पर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 659 आहे.

धनगरांच्या पारंपारिक वेशात पडळकरांनी घेतली शपथ, बहुजनांचा आवाज बनण्याचा दिला शब्द

राज्यात रविवारी (17 मे) विक्रमी 2347 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंतच 7 हजार 688 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. काल 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 33 हजार 53 झाला आहे. त्यापैकी 24 हजार 161 रुग्ण अॅक्टिव असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान,रविवारी लॉकडाउचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. तर दुसरीकडे आजपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली. ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू राहणार आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं काही सुटही दिली आहे.

कोरोनाच्या कचाट्यात अवकाळी पावसाचे संकट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!