नांदेड: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. पण संचारबंदी असताना सुद्धा अवैध धंदे करणाऱ्यांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. नायगाव तालुक्यातील मौजे कांडाळा शिवारात लिंबाच्या झाडाखाली काही जण २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता खुलेआम तिर्रट जुगार खेळत व खेळवत होते. ही माहिती मिळाल्यावर पोहेकाँ पंडित राठोड यांनी धाड टाकली. या धाडीत नगदी ४७००/-रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले.
या प्रकरणी पोहेकाँ राठोड यांच्या फिर्यादीवरुन आरोपी खाकीबा सूर्यवंशी, माधव म्हेत्रे, साहेबराव सूर्यवंशी, सुभाष चिठेवाड, गिरधारी सूर्यवंशी, खादर मगदूमसाब, पाशाचा मुलगा, रहिम देसाई रा.नरसी यांच्याविरुध्द रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुरनं ८५/२०२१ दाखल केला आहे. पुढील तपास बारोळे करीत आहेत. रस्त्यावर मिलन जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांनी चार जणांना पकडले. जनता कॉलनीच्या रस्त्यावर दिलीप भुरे रा.लेबर कॉलनी नांदेड, लहुदास भालेराव रा.मगनपुरा नांदेड, सौरभ भेरजे रा.नवीन श्रावस्तीनगर नांदेड, विशाल मुनेश्वर रा.जयभीमनगर नांदेड हे मिलन मटका जुगार खेळत व खेळवत होते.
त्यांना पकडून सपोनि फिरोज पठाण यांनी रोख २२३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. सपोनि पठाण यांनी दिलेल्या फिर्यादवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सानप करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतीचा वाद जीवावर बेतला; अर्धा एकर शेतीसाठी युवकाचा खून
- इस्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात दुर्घटना, ३० जणांचा मृत्यू
- वाढदिवस विशेष: ‘हिटमॅन’चे हे विक्रम मोडणे केवळ अशक्य
- कोरोना अलर्ट! उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात ७८३ बाधीत ; १८ जणांचा बळी
- रंग दे बसंती फेम सिद्धार्थला हत्येच्या धमक्या; भाजपवर संशय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

