सोलापूर : भाजपा नगरसेवक सुनील कामठी आणि पोलिस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्या मटका आणि जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकल्यानंतर झालेल्या पळापळीत परवेज इनामदार या कामगाराचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत परवेजच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. मारहाण झाल्यामुळे परवेज चा मृत्यू झाला असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे. दरम्यान पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी याच्यासह अटक केलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाजप नगरसेवक सुनील कामठी फरार झाला आहे.
भाजपा नगरसेवक सुनील कामठी आणि पोलिस कर्मचारी स्टीफन स्वामी हे दोघे मटका बुकी आणि जुगार अड्डा चालवतात. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पळापळी होऊन परवेज इनामदार एक कामगाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्टीफन स्वामी याच्यासह २२ जणांना ताब्यात घेतले होते. तर सुनील कामठी सह १८ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी परवजेचा चुलत भाऊ रफिक इनामदारसह त्याची पत्नी, मुले आणि नातेवाईक सिव्हील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी सीआयडी चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. परवेजला घटनास्थळी मारहाण झाल्याचा संयश त्यांना आहे. त्याला कोणी मारहाण केली, याचा तपास झाला पाहिजे. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रफिक इनामदार यांनी केली.
तर त्याच्या पत्नीने पोलिसांबरोबर परवेज यांची झडप झाली. यातून त्याने उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याची चौकशी करावी, आणि मटका बुकी चालवणाऱ्या भाजप नगरसेवक सुनील कामाटी याला अटक करण्याची मागणी केली. यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणात सीआयडी चौकशी होणार का याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नगरसेवक सुनील कामाटी फरार…
नगरसेवक सुनील कामाटी हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तो मुख्य सुत्रधार आहे. त्याला अटक झाल्याशिवाय या प्रकरणाचे वास्तव समोर येऊ शकत नाही. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान अटक असलेल्या २२ आरोपींपैकी स्टिफन स्वामी, रियाज काझी, प्रकाश हिट्टनळ्ळी, भीमाशंकर करजगी, संदेश चिताली, रियाझ मणीयार यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.
५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणारं महाराष्ट्र एकटं राज्य नाही; कपिल सिब्बलांनी केली ‘ही’ मागणी
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही ; विनायक मेटेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

