टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांशीवाय काही नाही, असा संदेश शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. राहुल शेवाळे यांनी खासदारकीचं पहिलं वेतन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून दिलं आहे.
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. दुष्काळामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेवाळे यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, राहुल शेवाळे यांनी लोकसभेच्या लेखा विभागाला पत्र लिहून माझं पहिलं एक महिन्याचं वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये जमा करावं, अशी विनंती केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

