Share

घरात घुसून ठोकण्याची भाषा करणाऱ्या सुप्रियाताई म्हणतात माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्लीपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लीप समोर आली आहे. भाजपात प्रवेश केला म्हणून सुळे यांनी फोनवरून घरात घुसून ठोकून काढण्याची भाषा वापरल्याचा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे.

सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. राहुल शेवाळे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनंतर सुप्रिया सुळेंनी फोनवरून धमकावल्याचे कथित ऑडीओ क्लीपमधून समोर आले आहे. पण सुप्रिया सुळेंनी हे आरोप फेटाळून लावत माझ्याविरोधात हे षडयंत्र असल्याचे सांगत मी राहुल शेवाळेंच्या विरोधात डीफिमेशन केस दाखल करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ऑडिओ क्लिप संभाषण असे…

सुप्रिया सुळे : राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे : हॅलो.

सुप्रिया सुळे : राहुल, सुप्रिया सुळे बोलतेय, तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे : नाही.

सुप्रिया सुळे : तुमचं स्टेटमेंट आहे की, पवार, सुळेंनी अपमानित केलं म्हणून…

राहुल शेवाळे : हां… नाही नाही…

सुप्रिया सुळे : तुम्हाला कधी अपमानित केलं मी?

राहुल शेवाळे : दोन पेपरला चुकीची स्टेटमेंट आली आहेत. एक सकाळला आलंय.. एक मटाला आलंय. मटाला तुमचं आणि दादाचं नाव आलंय.

सुप्रिया सुळे : एक मिनिट होल्ड करा… तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे. विजय कोलतेंचं नाव कसं तुम्ही आणताय मध्ये?

राहुल शेवाळे : नाय, नाय तसं नाय, म्हणलं तुम्हाला मी.

सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपमध्ये गेलाय हे ठीक आहे; पण एक लक्षात ठेवा. राहुल शेवाळे, सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढीन. आय एम सीरिअस. माझी बदनामी केली ना, तर अबू्रनुकसानीचा दावा करीन. माझ्यासारखी वाईट बाई नाही. कारण मी खरी बाई आहे. लक्षात ठेवा रेकॉर्ड केलं तरी चालेल.

राहुल शेवाळे : मी स्टेटमेंट केलेलं नाही, चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे.

सुप्रिया सुळे : एक लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नका. मी तुमच्याशी आतापर्यंत गोड वागलेय. आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी, माझी बदनामी केली तर काय येऊन करायचं, ते मी करीन.

ही क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!