नवी दिल्ली : भारतात अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव रोखण्यात केंद्र सरकारला यश मिळाले होते. पण दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांना मोठे हाल झाले. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येने देशाची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. अनेकांचा बेड, ऑक्सिजन, औषधांअभावी मृत्यू झाला. अजूनही ही लाट ओसरली नाही. या लाटेचा अंदाजच आरोग्य विभागाला आला नाही. त्यामुळे केंद्र सरकारसह नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेलाही तडा गेला.
देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याचा वेग तुलनेने कमी होता. तसेच कोरोना लशींचे वितरण, तुटवडा यामुळेही देशात मोठा वाद झाला. राज्यांना लस खरेदी करण्याचे अधिकार दिल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा निर्णय बदलण्यात आला. यामुळे काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्यमंत्री असलेल्या हर्ष वर्धन यांची विकेट पडली आहे.
आता मनसुख मंडाविया यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल केला आहे. राहुल गांधी ट्विट करत, ‘याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही?’ असा प्रश्न विचारला आहे. यासोबतच त्यांनी ‘चेंज’ असा हॅशटॅग दिला आहे.
Does this mean no more vaccine shortage?#Change
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 8, 2021
यापूर्वी राहुल गांधींनी अनेकदा केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरूद्ध जोरदार हल्लाबोल केला होता. गेल्या आठवड्यात कोरोना लस नसल्याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यावेळी देखील त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्यामध्ये असे म्हटले की, ‘जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही’. त्या अगोदर राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते. यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यांना कठोर उत्तर दिले.
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- ‘कोणी सांगितले मुंडे भगिनी नाराज आहेत? त्यांची उगीच बदनामी करू नका’, फडणवीस संतापले
- ‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले होते’, दरेकरांचा राऊतांना टोला
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी नाही, पण शरद पवारांनी फोन करून शुभेच्छा दिल्या’, मंत्री राणेंची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

