नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर हा विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेशदायक – जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.
अशात नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जोशी सांगवी गावातील रणरागिणीने गरुडझेप घेत यशाला गवसणी घातली आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यांच्या घरात ना लाईटची सुविधा होती, ना पाणी वेळेवर यायचं. शाळेत जाणाऱ्या एका चिमुकलीला हे बघून एक चीड निर्माण झाली आणि व्यवस्थेत बदल करण्यासाठी त्यांनी व्यवस्थेतच जागा निर्माण करायचं मनाशी पक्कं केलं. अन ध्येय गाठलं थेट उपजिल्हाधिकारी बनून. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही सत्य कथा आहे शेख वसिमा मेहबूब यीची. या रणरागिणीची कहाणी बीबीसी मराठीने जगासमोर आणली आहे.
अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेल… घरात एकूण 6 भावंडं. 4 बहिणी, 2 भाऊ आणि आई-वडील. वडिलांचं मानसिक आरोग्य पहिल्यापासूनच बरं नसल्यानं त्यांच्याकडून कोणतंही काम होत नव्हतं. त्यामुळे मग वसिमाची आई मोलमजुरी करून, लोकांच्या इथं भांडीकुंडी करून घर सांभाळायच्या. मोठा भाऊ ऑटो रिक्षा चालवून आईला मदत करायचा.
माझं 10 वीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. त्यानंतर 12 किमी अंतरावर कॉलेज होतं. त्यासाठी दररोज 6 किमी पायी चालत जावं लागायचं. अकरावीला नियमितपणे वर्षभर चालत जाऊन कॉलेज मी केलं अस वासिमा सांगते.
2015ला माझं बीए कम्प्लीट झालं. 2015-16ला मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. गावाकडे पुस्तकं, वर्तमानपत्रं नसायची त्यामुळे खूप अडथळा होता. लायब्ररीची सुविधा नव्हती. आमच्या समाजात मुलीवर खूप बंधनं असतात. नांदेडला होते तर तिथं पण लायब्ररीला जात येत नव्हतं. समाजातल्या खूप साऱ्या लोकांचा विरोध होत होता. कारण एक तर मी मुलगी होते हा पहिला मुद्दा, आमच्या समाजात मुलींच्या शिक्षणाला विरोध आहे. मुलींना शिकवण्याची मानसिकताच नाही लोकांची. अस वसिमा खेदाने सांगते.
दुसरं म्हणजे परंपरेनं लादलेली अनेक बंधनं जसं की पडदा पद्धती आहे, अशा स्थितीत लायब्ररीला जाणं, तिथं पंधरा- पंधरा तास अभ्यास करणं लोकांना पटणारं नव्हतं. त्यामुळे मला नांदेडला अभ्यास करता येत नव्हता. अस देखील वसिमा सानाग्त होती. आपल्या बहिणीची कुचंबना बघून वसिमा यांचा भाऊ शेख इम्रान यांनी त्याचं शिक्षण सोडलं आणि ऑटो रिक्षा चालवायला घेतली.
…म्हणून शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या मंचावर, जयंत पाटलांची सारवासारव
माझा भाऊ मला म्हणाला की, तू पुण्यात जा, तिथं तुला अभ्यासासाठी चांगलं वातावरण मिळेल. त्यामुळे 2016ला मी पुण्याला गेले. तिथं लायब्ररी जॉईन केली, अभ्यास केला. MPSCच्या पहिल्या प्रयत्नात मी पूर्व परीक्षा पास केली, पण, मुख्य परीक्षेत दोन मार्क्स कमी मिळाले. 2018मध्ये मात्र मला STIची पोस्ट मिळाली आणि मी नागपूरला जॉईन केलं. पण, मला ऑफिस वर्क पेक्षा लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायला आवडतं. म्हणून मग मी सर्व्हिस करता करता अभ्यास चालू ठेवला आणि आता मला उप-जिल्हाधिकारी पद मिळालं आहे. हे सांगताना वसिमा यीच्या यशात तिचा भाऊ आणि आईचे कष्ट आहेत हे तिच्या डोळ्यात सरळ दिसत होत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

