Share

विधानसभा निवडणुकीसाठीतरी संघटना मजबूत करा : राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेची निवडणूक हरलो पण, आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी संघटना मजबूत करा, असे आदेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. शनिवारी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राहुल गांधींनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नेत्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांशी राज्य स्तरावर जागावाटपाची चर्चा सुरु करा. तसेच लोकसभा निवडणुकीत प्रदेश काँग्रेसला मोठे अपयश पत्करावे लागले असले आणि पक्ष संघटना कमकुवत झाली असली तरी आता नव्या उमेदीने काम करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रासह, झारखंड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार असून अन्य तीनही राज्यांतील नेत्यांशी राहुल यांनी चर्चा केली आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण, आता हा विषय संपलेला असून त्यावर चर्चा केली जाणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!