Share

MNS | राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळणार; मनसेचा इशारा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

MNS | मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज शेगाव येथे जाणार असून तिथे सभा देखील घेणार आहेत. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मनसे (MNS) पक्षाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शेगाव (Shegaon) येथील सभा उधळण्याचा इशारा संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी दिला आहे. महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत.

मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ठाणे, भिवंडी, नाशिक असा प्रवास करत ते शेगावला पोहोचणार आहेत. तसेच काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत, असं देशपांडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!