बंगळुरू : कर्नाटकात ३० ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन जागांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांना अंमली पदार्थांचे व्यसन करणारी व्यक्ती असे संबोधले आहे. तसेच ते ड्रग्सची तस्करी करत असल्याचा खळबळजनक दावाही केला आहे.
‘राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,’ असं नलीन कुमार कटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कर्नाटक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक ट्विट केले होते. या ट्विटमुळे वाद झाल्यानंतर ते ट्विट मागे घेण्यात आले. कर्नाटक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अंगठे बहाद्दर’ (अंगूठा छाप) म्हणण्यात आले होते. कन्नड भाषेत करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये काँग्रेसने लिहिले होते, ‘काँग्रेसने शाळा उभ्या केल्या. मोदींनी शिक्षण घेतलं नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या गेल्या तरी देखील त्यांनी शिक्षण घेतलं नाही. भिक मागण्यावर रोख आहे, मात्र भिक मागून सामान्य लोकांना देखील भिकारी बनवत आहे. देश ‘अंगठे बहाद्दर’ मोदींमुळे या स्थितीत पोहोचला आहे.’काँग्रेसचं हे ट्विट कर्नाटकात व्हायरल झालं. त्यानंतर भाजपनं विरोध करत यावर आक्षेप घेतला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन

