Share

शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन

Published On: 

बीड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाने तोकडी मदत जाहीर करून पाने पुसली आहेत. याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे विभाागीय आयुक्त कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.

आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह किसान मोर्चाचे उत्तमराव माने, प्रवीण पवार, बाळासाहेब मस्के यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना रमेश पोकळे म्हणाले, मराठवाड्यात ढगफुटीसह अतिवृष्टीने पुरस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यात लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. जनावरे, मृत्युमुखी पडले आहेत.

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. जमीन वाहून गेलेली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहेत. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे असंवदेनशील आहे. शेतकऱ्यांना ठोस मदत जाहीर करण्यात आलेली नाही. एकरी ४ हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप किसान मोर्चा आक्रमक झालेला असून सरकारचा निषेध करण्यासाठी २१ ऑक्टोबर राेजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!