नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी गुरुवारी ट्विट केले की ‘मोदी देशाला उद्धवस्त करत आहेत.’ ‘नोटाबंदी, जीएसटी, कोरोना साथीच्या काळात दुरावस्था, अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी एक भ्रम निर्माण केला आहे. हा भ्रम लवकरच तुटेल.’ असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मोदी देश को बर्बाद कर रहे हैं।
1. नोटबंदी
2. GST
3. कोरोना महामारी में दुर्व्यवस्था
4. अर्थव्यवस्था और रोज़गार का सत्यानाशउनके पूँजीवादी मीडिया ने एक मायाजाल रचा है। ये भ्रम जल्द ही टूटेगा।https://t.co/8JWoOY1jGK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 30, 2020
वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीमध्ये केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांविषयीची एक बातमी शेअर करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा परिणाम झाल्यामुळे देशात 10कोटी नोकऱ्या संकटात आहे. असं केंद्र सरकारनं समितीला सांगितलं आहे. याविषयीची एक बातमी ट्विट करून राहुल गांधीनी मोदींवर हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीचे दुध उत्पादकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – राधाकृष्ण विखे
तत्पूर्वी राहुल गांधींनी राफेल खरेदीसंदर्भात मोदी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यांनी विचारले होते की, प्रत्येक विमानाची किंमत 526 कोटीऐवजी 1670 कोटी का दिली गेली? 126 ऐवजी केवळ 36 विमानांची खरेदी का करावी? दिवाळखोर अनिल अंबानी यांना एचएएलऐवजी 30 हजार कोटींचे कंत्राट का देण्यात आले?
अयोध्येत बुद्धविहार देखील उभारा; रामदास आठवले घेणार योगींची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

