Share

महाविकास आघाडीचे दुध उत्पादकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – राधाकृष्ण विखे

Published On: 

अहमदनगर : ‘शेतीला जोडधंदा म्हणून उपयुक्त असलेल्या दूध व्यावसायाकडे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दूध दरासाठी इशारा आंदोलन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या, तरीही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचे दूध संघही कमी दराने दूर खरेदी करीत आहेत,’ असा आरोप माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

दूध दराच्या प्रश्नावर १ ऑगस्टपासून दूध संकलन बंद ठेवण्याचे आंदोलन विविध शेतकरी संघटनांनी पुकारले आहे. भाजपनेही या आंदोलनात भाग घेतला आहे. यासंबंधी बोलताना विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या समस्‍या दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. शेतीला जोडधंदा म्‍हणून दूध व्‍यवसाय शेतकऱ्यांना आधार ठरला आहे.

10 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस बाजारात आणणार, रशियाचा मोठा दावा

मात्र, या व्‍यवसायाकडे महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. करोनाच्या संकटामुळे दूध उत्‍पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. राज्‍यात आता दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्याही आत्‍महत्‍या सुरू झाल्‍या आहेत. त्‍याच्‍याही संवेदना या सरकारला राहिलेल्‍या नाहीत. करोनाच्या संकटात दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर २५ रुपये हमीभाव देण्‍याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्‍यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्‍पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.’ अस विखे पाटील म्हणाले आहेत.

सिन्नरमध्ये ‘पारनेर पॅटर्न’, राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेनेचे नगरसेवक फोडले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!