Share

‘गेल्या ४ महिन्यात 2 कोटी लोकंच्या नोकऱ्या गेल्या, फेसबुकवर अफवा परवून सत्य लपणार नाही’

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना, लॉकडाऊन, भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मोदी सरकारवर सातत्याने घणाघाती टीका करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकाच्या नोकऱ्या केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ‘4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात’ असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘गेल्या 4 महिन्यांत जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयुक्त अशोक लावासा यांचा राजीनामा

राहुल गांधी यांनी बुधवारी (19 ऑगस्ट) याबाबतचे एक ट्विट केलं आहे. तसेच यासोबतच एक बातमीही पोस्ट केली आहे. बातमीत एप्रिल 2020 पासून ते आतापर्यंत 1 कोटी 89 लाख नोकऱ्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट केलं होतं. राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून (EIA2020) देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

ठाकरे सरकारच्या शिवभोजन सारखे कॉंग्रेसचे ‘इंदिरा रसोई’ , फक्त ८ रुपयांत मिळणार जेवण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!