नवी दिल्ली – भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच आशियन विकास बँकेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार लवासा यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी राष्ट्रपतींकडे त्यांना 31 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे.लवासा हे सप्टेंबर महिन्यात फिलिपिन्स येथील आशियन विकास बँकेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे.
लवासा हे १९८० च्या तुकडीचे हरयाणा केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. याआधी त्यांनी केंद्रीय अर्थ आणि नागरी उड्डाण खात्याचे सचिव म्हणून काम केलेले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून व्यावसायाची पदवी घेतलीय. तसंच ‘युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास अॅन्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’मध्येही त्यांनी पदवी प्राप्त केलीय.
महत्वाच्या बातम्या-
राजीनाम्याचा विषय निघाला तर प्रकरण दिल्लीपर्यंत जाईल, संजय राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

