Share

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या ‘या’ रांगड्या पोलीस उपअधीक्षकाला ओळखलं का ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैलवान राहुल आवारे याला शासकीय सेवेत रुजू झाला आहे. भारतीय तिरंगा आंतरराष्ट्रीय कुस्तीत डौलानं फडकावणारा मराठमोळा पैलवान राहुल आवारेची पोलीस उपअधीक्षकांच्या गणवेशातली छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या सुवर्णपदकानं राहुलला महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेत थेट नोकरी मिळवून दिली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बीडचा सुपूत्र कुस्तीपटू राहूल आवारे याची माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली होती.राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

गोल्डकोस्ट येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या राहुल आवारेने कुस्तीत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली .५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात करत राहुलने या स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

शेवटच्या फेरीत स्टिव्हन ताकाहाशीने राहुलला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने स्टिव्हन ताकाहाशीचा डाव त्याच्यावरच उलटवत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं होते .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!