टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठे पद मिळणार, अशी चर्चा आहे. कृषिमंत्रिपदासाठी सध्या त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारण्यास शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे.
राजू शेट्टी यांच्या या निर्णयावर आता शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी चांगलच तोंडसुख घेतल आहे. राजू शेट्टी यांनी देशाचे कृषीमंत्री व्हावे. शेट्टींना शेतीतील काही कळत नाही, जर त्यांना काही कळत असते, तर शरद जोशी यांना त्यांनी सोडले नसते. शेतीतील न कळणारेच कृषीमंत्री होत असतात. केवळ सरकारची धोरणे पुढे नेण्याचे काम करतात. असा घणाघात रघुनाथ पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात संपूर्ण व सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले असून, त्यांनी यू टर्न घेतल्यास त्यांना घरी जावे लागेल, असा इशारा देखील रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.
सरकार बदलले तरी धोरण बदलत नाहीत. राज्यात आघाडी सरकार असून, या पक्षांनी जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी ती पूर्ण करावी. सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण होत आहे. आयात जास्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनांना भाव मिळत नाही. परिणामी त्यांना आत्महत्या करावी लागते. अस रघुनाथ पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1203254109815496708?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203253756327907331?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203253359089606658?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

