नवी दिल्ली: ‘अमुल’ हे देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक समूह त्यांच्या खास जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहे. देशाशी निगडित कोणतीही खास बाब घडली कि लगेच अमुल आपल्या पद्धतीने ती लोकांसमोर मांडत असते. मग क्रिकेट असो, देशाच्या सैनिकांप्रती असो वा संशोधन सर्वच घटनांना योग्य रित्या अमुल मांडत असते. असाच एक फोटो देशात आज दाखल होणाऱ्या राफेल या युद्ध विमानांचे स्वागतासाठी शेअर केला आहे.

फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे.प्रशिक्षित टीम अंबालामध्ये विमानांचा ताबा घेणार आहे.ही पाच विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून आज भारतात पोहोचतील.
महाराष्ट्रातील ‘हा’ संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग
अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी अंबाला हवाईतळही राफेल विमानांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. तसेच, अंबाला हवाईतळाजवळील ३ किलोमीटरच्या परिसराला ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे. ३ किलोमीटरच्या आत ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सरकार पाडता येत नसेल तर… सामनातून भाजपावर सडकून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

