Share

दूध उत्पादक आक्रमक : महाआघाडी सरकारचा निषेध करीत विखे पाटलांनीही केले लोणीत आंदोलन

Published On: 

नगर- दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीनेआंदोलनात उडी घेतली आहे.

दरम्यान, दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी  सकाळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एका बाजूला शेतकरी हितासाठी हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकारच्या बचावासाठीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी धावले आहेत.शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

‘भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे.केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल’ असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले खंडन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!