Share

‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचे जोरदार टीकास्त्र

Published On: 

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीका केली. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

वाढती कोरोना रुग्णसंख्या, शाळा सुरु करणे, लोकल, वाढीव वीजबिलात दिलासा व इतर अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार का? याकडं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष्य लागलं होत. उद्धव ठाकरे यांनी  काल रात्री ८ वाजता जनतेसोबत संवाद साधला. त्यामुळे ते कोणत्या विषयावर बोलणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. पण वाढीव विजबीलासारखा ऐरणीवर असलेल्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणं टाळलं अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

दरम्यान आज वाढीव वीज बिल विरोधात भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाच भडका पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते  आज वीज बिलांची होळी करणार असून, राज्यभरात होळी पेटवून आंदोलन सुरु केले आहे. पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!