Share

राज्य सरकारचा तुकाराम मुंढेच्या ‘त्या’ नियमाबाबत व्यापाऱ्यांना दिलासा

Published On: 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कारवायांमुळे त्यांना राजकीय मंडळी , व्यापारी, अवैध धंदे करणाऱ्या अनेक माफियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले असले तरी कामाची पद्धत त्यांनी कायम ठेवली आहे.

नागपूर महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात त्यांनी काटेकोर नियम व पॅटर्न राबवला आहे. आता, मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असून अनेक नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. नागपूरमध्ये मात्र दुकानदारांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागत होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील प्रत्येक दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. चाचणी न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला होता.  त्यामुळे तुकाराम मुढेंच्या या नियमाला अनेक दुकानदारांनी नाराजी व्यक्त करत जाहीरपणे विरोध देखील केला होता.

राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार

एकबाजूला, राज्यातील कोरोना चाचण्यांची असलेली मर्यादा, त्यासाठी लागणारा खर्च तसेच इतर अत्यावश्यक बाबी लक्षात घेता राज्य सरकारतर्फे एका परिपत्रकाद्वारे कोरोना चाचणी करण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. या पत्रकानुसार लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना आता कोरोना चाचणीची गरज नसल्याने नागपुरातील हजारो व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे होणार अन्नधान्य उपलब्ध

राज्य सरकारने चाचण्या करण्याची आवश्यकता असलेल्या व्यक्तींची तीन गटात विभागणी केली आहे, त्यानुसार त्यांच्या चाचणीचा प्रकार देखील निवडला जाणार आहे. यासंदर्भात टीव्ही ९ने वृत्त दिले आहे.

विघ्नहर्त्याचे आगमन झाले मात्र राज्यात कोरोनाचे संकट कायम! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ‘तब्बल’ इतका

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!