🕒 1 min read
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांना काल शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीशिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
कारण आज सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली. परंतु यावेळी कप्तान अजिंक्य रहाणे शांत बसला नाही. सिराजने तक्रार करताच कर्णधार रहाणेने याबाबतची पंचांकडे तक्रर केलीच सोबतच सामनादेखील थांबवला. कर्णधार रहाणेने घेतलेल्या भूमिकेनंतर पंच आणि पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पंचांनी पोलिसांच्या मदतीने सिराजवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानं त्याचा अनुभव सांगताला ऑस्ट्रेलियात अनेकदा धर्म व रंगांवरून टीका केली गेल्याचे सांगितले. दरम्यान, आजच्या घटनेचा अनेक क्रिकेटपटूनी निषेध केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका’
- वॉटर ग्रिड प्रश्नावर मराठवाडयातले मंत्री तोंड का उघडत नाहीत ?
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- #भंडारा जिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाची चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करा- दरेकर
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
