Share

भारताची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. ‘झाशी ची राणी’ अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘स्वोर्डस अँँड स्केपटर्स’ नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या या ज्वलंत घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे. भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर, आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचा वावरदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. राणी लक्ष्मीबाईची यशोगाथा जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लवकरच पोहोचवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच तडफदार पोस्टर लाँँच करण्यात आला.

‘स्वोर्डस अँँड स्केपटर्स’ हा हॉलीवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. १८५७ च्या उठावाची क्रांतीज्योत पेटवणा-या राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी रूप यात आपल्याला दिसून येते.

हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शिका स्वाती भिसे असे सांगतात कि, ‘राणी लक्ष्मीबाईचे जीवनचरित्र स्फुरण देणारे आहे. आजच्या स्त्रियांना तिची शौर्यगाथा आणि तिने केलेला संघर्ष प्रेरणादायी ठरणारे आहे. कोणत्याही पुरुष पाठबळाशिवाय मुठभर सैनिकांना घेऊन बलाढ्य इंग्रजी सैन्यावर चालून गेलेली हि महिला, जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा माझा मानस होता. त्यासाठी सर्वप्रथम, तिची शौर्यगाथा नाट्यसंगीतातून मांडण्याच्या मी विचारात होते. पण, या ज्वलंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गाथा जगातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांपर्यत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचा मोठा पडदा महत्वाची भूमिका बजावेल, याची जाणीव मला झाली. आणि त्यामुळेच हा सिनेमा बनवण्याचा मी विचार केला.’

हॉलीवूडच्या धर्तीवर साकार झालेल्या ‘स्वोर्डस अँँड स्केपटर्स’ ची निर्मिती स्वाती भिसे यांनीच केली असून, चार्ल्स सेलमोन हे सहनिर्माते आहेत. स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीश सत्ताधीशांना धाडसाने सामोऱ्या जाणा-या या रणरागिणीचा ‘स्वोर्डस अँँड स्केपटर्स’ हा ब्रिटीश सिनेमा भारताबरोबरच जगभरात लवकरच प्रदर्शित होणार आहे.

‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण

दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!