टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून परतलेल्या नागरिकांना विलगिकरण कक्षात (क्वॉरंटाईन) निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन जर्मनीहून परतल्यानंतर त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ७० किमी अंतरावर विलगिकरण कक्ष उभारण्यात आला आहे. दिल्लीतील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भारत सरकारकडून चांगली सुविधा पुरवण्यात येत असल्याची माहिती धवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. शिखर धवनने फेसबुकवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला असून व्हिडिओच्या माध्यमातून त्याने प्रशासन आणि सरकारचे आभार मानले आहेत.
‘मी नुकताच जर्मनीहून दिल्लीला परतलो आहे. दिल्ली विमानतळापासून ७० किमी अंतरावर परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. याठिकाणी प्रत्येकाला स्वतंत्र खोली देण्यात येत असून प्रशासन आणि पोलिस उत्तमरित्या कर्तव्य बजावताना पाहायला मिळाले. जेवणापासून इतर आवश्यक सुविधा देखील उत्तमरित्या उपलब्ध करुन देण्यात येत आहे तसेच मला जर्मनीतही अशीसुविधा बघायला मिळाली नाही. तसेच यावेळी धवनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले आहे. धवनने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात प्रभावीत असणाऱ्या अव्वल दहा राष्ट्रांमध्ये जर्मनीचा समावेश आहे. जर्मनीमध्ये ७ हजार २०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून याठिकाणी आतापर्यंत १७ जणांनी आपला जीव गमावला आहे. धवन नुकताच जर्मनीतून दिल्लीला पोहचला असून त्यालाही इतर प्रवाशांसह क्वॉरंटाईन प्रक्रियेतून जावे लागले. त्यामुळे इतर प्रवाशांप्रमाणे त्याला या विलगिकरण कक्षात ठेवले आहे.
https://www.facebook.com/shikhardhawanofficialpage/videos/213344060000171/
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

