दुबई : यंदाच्या आय पी एल मध्ये महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सलग ६ सामने गमावले असून, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत झालेल्या सामन्यात अखेर विजय मिळवला होता.
मुंबई सोबत काल झालेल्या सामन्यात देखील मुबई इंडियन्स कडून पंजाबचा पराभव निश्चित होता. परंतु पंजाबच्या संघाने कालचा सामना पूर्ण जीव ओतून खेळला. फॉर्म मध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सचा विजयरथ अडवून पंजाबनं स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. मुंबई इंडियन्सची सलग पाच सामन्यांतील विजयी मालिका रविवारी पंजाबनं रोखली.
या विजयाबरोबर पंजाबनं थेट सहाव्या स्थानी झेप घेतली असून प्ले ऑफच्या शर्यतीतील दावेदारीची आस कायम राखली आहे. मुंबईनं १२ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. या पराभवाबरोबच मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख खेळाडूला दुखापत झाली होती व त्याला सामना मध्यंतरी सोडून जावे लागले.
या आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत न घडलेली गोष्ट रविवारी झाल्येला सामन्या दरम्यान घडली. ती म्हणजे एकाच दिवशी खेळण्यात आलेले दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. रविवारी खेळण्यात आलेला पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. तर मुबंई इंडियन्स विरुद्ध पंजाब सामन्यात देखील सुपर ओव्हर झाली या सुपर ओव्हरमध्ये पंजाबनं बाजी मारली.
महत्वाच्या बातम्या-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
- राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी- अनिल बोंडे


