मुंबई : राज्यात मे महिन्याच्या अखेरीस दैनंदिन रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसून आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळेच आता मुंबईकरांच्यादृष्टीने महत्वाची असलेली लोकल सेवा सर्वांसाठी कधी पासून सुरु, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता तुर्तास त्याबाबत काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्या मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मुंबईत लोकल ट्रेन नेमक्या कधी सुरू होणार याचं उत्तर महापालिका देऊ शकत नाही. राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आणि त्यावर निश्चितच विचार केला जात असेल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आणि त्यावर निश्चितच विचार केला जात असेल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. लोकल सुरू झाली की त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मागील वेळीही तसं झालं होतं. मोठ्या संख्येनं लोक विनामास्क ये-जा करत होते. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर झाला होता. त्यामुळं लोकल ट्रेनसाठी आपल्याला आणखी काही दिवस थांबावं लागेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला! कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धू आमने-सामने
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- २० वर्षांनी थिरकले गोविंदा- नीलम `या` गाण्यावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

