Share

‘इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी, हे तर केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट’; जयंत पाटलांचा भाजपला टोला

Published On: 

मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. यामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वच स्तरातील नागरिक हे आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

अशातच, सामान्यांच्या खिशावरील आर्थिक ताण वाढत असून तेलापासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत मोठ्या प्रमाणात भाववाढ केली जात आहे. मागील काही महिन्यांपर्यंत शंभरीच्या दारात गेलेल्या पेट्रोलच्या किंमती देशातील पश्चिम बंगाल, केरळसह ५ राज्यांच्या निवडणुकांच्या काळात काहीशा कमी झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये दररोज वाढ होत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली असून सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन/जीडीपी) उणे (-) 7.3 टक्के नोंदवला गेलाय.

या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे,’ असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!