टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक लोक आपल्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. यात धार्मिक देव दर्शनासाठी गेल्याची संख्याही मोठी आहे.
महाराष्ट्रातील नांदेड येथील हजूर साहिब येथे पंजाबमधील जवळपास ३००० भाविक अडकून पडले आहेत. या भाविकांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी प्रयत्न केली जावेत अशी मागणी त्यांच्या नातेवायिकांकडून होत आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबात खुलासा केला आहे कि,
सर्व औपचारिकता महाराष्ट्र सरकारसोबत यापूर्वीच पूर्ण केल्या आहेत. हजूर साहिबमध्ये अडकलेल्या लोकांसाठी. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह नेतृत्व करत असलेल्या पंजाब सरकार लवकरच त्यांना परत आणणार असून त्यांच्या वाहतुकीसाठी पैसे देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
https://twitter.com/CMOPb/status/1253330223396872196
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पंजाबच्या नांदेडमधील ३००० हून अधिक यात्रेकरूंना सुरक्षित मार्गे जाता यावे मिळावा अशी विनंती पंजाब सरकारने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. माहिती व जनसंपर्क विभाग, पंजाब.
Punjab Government has requested the Maharashtra Government to allow safe passage to over 3000 pilgrims from the state, who are stranded in Nanded due to lockdown in wake of #COVID19: Information and Public Relations Department, Punjab
— ANI (@ANI) April 23, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

