Share

सचिन तेंडुलकरने दिलेल्या आवाहनाला पुण्यातील महिला क्रिकेटपटूने दिला प्रतिसाद; लसीकरणाआधी केले रक्तदान

Published On: 

पुणे : काही दिवसापुर्वी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी सचिनने आपल्या चाहत्यांना प्लाझमा आणि रक्तदान करण्याचे अवाहन केले होते. सचिनच्या या अवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील एका महिला क्रिकेटपटूने रक्तदान केले आहे.

या महिला क्रिकेटपटुचे नाव तेजल हसबनिस असे आहे. देशात आणि राज्यात १ मे पासुन १८ ते ४५ वर्षीय वयोगटातील नागरीकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर मात्र काही दिवस रक्तदान करणे शक्य नाही. त्यामुळे लसीकरण सुरु झाले तर रक्ताचा तुटवडा भासु शकतो. यामुळे लस घेण्यापुर्वी तेजल हसबनिसने रक्तदान केले आहे. यावेळी तिने इतरानांही रक्तदान करण्याचे आवाहन केले.

२३ वर्षीय युवा महिला क्रिकेटपटू तेजल हसबनिस ही गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या रणजी संघाची अविभाज्य भाग आहे. मागील काही वर्षात सातत्याने तेजलने महाराष्ट्राचा वरिष्ठ संघ आणि २३ वर्षांखालील संघाकडून खेळतांना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तेजल आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ती उपयुक्त फिरकीपटू देखील आहे. २०१९ साली तेजलला भारतीय अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!