पुणे- राज्यासह देशातील कोरोना रुग्णांची सद्या वाढत आहे. राज्यातील प्रमुख कोरोना बाधित जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज व रेड या तीन भागात वर्गवारी केली गेली आहे. पुणे, मुंबई व पिंपरी-चिंचवड या शहरांत कोरोनाची संख्या दिवसेंदिवस जास्त वाढत असून केंद्रीय पथकाने देखील पुण्यातील हि संख्या गंभीररित्या वाढत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सद्या पुण्यात सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा जसे कि, भाजीपाला, किराणा इत्यादी यांच्या विक्रीला परवानगी प्रशासनाने दिली होती. मात्र, अत्यावश्यक सेवा दुकानांची मर्यादित संख्यामुळे परिणामी नागरिक गर्दी करत होते. त्यामुळे शहरातील दुकानांची वेळ हि दोन तास आणखी वाढवावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना केली होती.
आज मोहोळ यांनी ट्विट करून सांगितले कि, अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ वेळ !
अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ वाढण्यात आली असून याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांशी कालच चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वाढवलेल्या वेळेमुळे दुकानदार व पोलीस यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे भान राखत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन महाराष्ट्र देशा टीम तर्फे आम्ही करत आहोत.
अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ वेळ !
अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ वाढण्यात आली असून याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांशी कालच चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. #PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 27, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

