पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा होता. आता केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हातात घेतली असून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
तर, विदेशी लसींना परवानगी देण्यात येत असून स्पुतनिक वी ही लस देशात दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबादमध्ये या स्पुतनिक व्ही लस देण्यात आल्यानंतर ही लस महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. स्पुतनिक वी लस आता पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. स्पुतनिक वी लसीचा एक डोस ११४२ रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये मिळेल.
पुणे शहरातील रुग्णालयांना स्पुतनिक वी लसीचे ६०० डोस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील स्पुतनिक लसीचा पहिला डोस पुण्यात दिला गेला. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका ३६ वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस दिली गेल्याच डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पुणेकरांना स्पुतनिक वी लस २८ जूनपासून उपलब्ध होईल, अशी माहिती देतानाच लस घेण्यासाठी कोविन ऍप आणि पोर्टलवर पूर्वनोंदणी करणं आवश्यक असल्याचं डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत मयताला पोहोचतात, पण आंबिल ओढ्याप्रकरणी…’
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- गरीब दलित विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे अनुदान कधी सुरु होणार ?
- अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा; अडचणीत होणार वाढ?
- ‘तपास यंत्रणांचा वापर विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

