पुणे : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ६ मार्च रोजी पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे मेट्रोचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुणे मेट्रोमधील गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर या मेट्रोच्या टप्प्याचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच पुणे महानगरपालिका भवनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रोचे उदघाटन आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण झाल्यानंतर मोदी कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असून ; तिथे अन्य काही ऑनलाईन उदघाटन कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहेत. देशाचे प्रधानमंत्री पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरात जोरदार विकासकामे चालू आहेत.
तसेच नरेंद्र मोदी ज्या मार्गाने जाणार आहेत तो मार्ग दुरुस्त करणे, चकाचक करणे अश्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमांना आता पुण्यात वेग आला आहे. नरेंद्र मोदी ज्या मार्गाने पुणे शहरात प्रवास करणार आहेत ; त्या त्या मार्गांवर रस्ता स्वछ करणे, अतिक्रमण हटवणे, खड्डे बुजवणे अश्या प्रकारची काम जोमाने चालू आहेत. पुणे शहरात विकासकामांनी अचानक वेग पकडल्याने पुणेकरांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर’; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
- “लवासाबाबद सत्तेचा दुरुपयोग, मी गप्प बसणार नाही”; किरीट सोमय्या आक्रमक!
- Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय वायुदल मैदानात
- “नवाब मलिक दाऊदचे खरे फ्रंट मॅन”, निलेश राणेंचा हल्लाबोल
- Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

