Share

भरमसाठ उणीवांनंतर पुण्याचे महापौर थेट ‘जम्बो रुग्णालयात’!

Published On: 

पुणे : गेले पाच महिने पुण्यासह राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत. कोट्यवधी खर्चून जम्बो रुग्णालये उभारली पण आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने रोज अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्यामुळे पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेल्या उणीवा समोर आल्या आहेत. यानंतर राज्य सरकार, महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात असून, राजकीय नेत्यांनी देखील आता त्वरित हालचाली सुरु केल्याचे दिसून येत आहे.

आज, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली आहे. त्यांनी, ” ‘जम्बो’त रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते आणि सुविधा मिळत नाहीत, असे तक्रारींचे स्वरूप होते.” असे ट्विट करून सांगितले आहे.

मनसे नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी जम्बो रुग्णालयात बाऊन्सर नेमल्याविरोधात काही दिवसांपूर्वी गेट वरून चढून या विषयी जाब विचारण्यासाठी प्रवेश केला होता. यानंतर, त्यांना आज अटक केल्याननंतर जमीन देखील मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची कोरोनावर मात

पासवानांचा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास नकार, एनडीएत फुट पडण्याची शक्यता

राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेची देवेंद्र फडणवीसांनी काढली लक्तरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!