Share

पुणे : अतिवृष्टीमुळे शहरात पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकंदर 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काल प्रशासनानं दिली.पुणे शहरातल्या एकंदर 5 हजार नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून शहरातली 61 जनावरं मरण पावली असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरव राव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली आहे.बुधवारच्या अतिवृष्टीमुळे पुण्यातल्या पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरून सर्व पंप नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणार्या संपू्र्ण बिबवेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड परीसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परीसर सातारा रोड परीसर या भागांना काल पाणी पुरवठा झाला नाही. पुढचे पाच दिवस इथं कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

जिल्ह्यातले हवेली, भोर, पुरंदर आणि बारामती हे 4 तालुके अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून लहान मोठी मिळून 832 जनावरंही दगावली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

बारामती जवळील नाझरे धरणातून बुधवारी रात्री उशिरा 85 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने कऱ्हा नदीच्या कडेला असणाऱ्या सुमारे 14 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. आचार संहितेचा कोणताही अडसर मदत आणि बचाव कार्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177511489436934145?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177511229117489154?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177510896379187202?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!