टीम महाराष्ट्र देशा : कोकण गोवासह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागानं वर्तविली आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवत आहे. त्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
‘महा’ चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली, वेल्हा, शिरूर तालुक्यांतील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190526671465566208?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190522918809165826?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

