🕒 1 min read
पुणे : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे.
तसेच गेल्या 14 मार्चला 41 वर्षीय एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5-6 दिवस खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने या अंगणवाडी कार्यकर्ता महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या महिलेची मोठी बहीण ही याच रुग्णलयात परिचारीका म्हणून काम करते. तिने तिच्या लहान बहिणीची काळजी घेतली. तोपर्यंत या महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालेलं नव्हतं. चार दिवसांनंतर तिचा रिपोर्ट आला, त्यामध्ये ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर या महिलेचा पती, मुलगा, बहीण, बहिणीचा पती आणि मुलगी या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
मात्र, पुण्याच्या दोन बहिणी आणि त्यांच्या कुटुंबांनी मात केली आहे. या बहिणींच्या कुटुंबातील 6 सदस्य हे कोरोनाबाधित होते. मात्र, आता या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते सर्व आता निरोगी आहेत. अशी माहिती दैनिक भास्करच्या वृत्तात देण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
