Share

पुणे : मार्केट यार्डात दशेरी, चौसा आणि लंगडा आंब्यांचा हंगाम बहरला

Published On: 

पुणे :  गुलटेकडी येथील मार्केट यार्डात उत्तर प्रदेशातील दशेरी, चौसा आणि लंगडा या आंब्यांचा हंगाम बहरला आहे. चवीला गोड असणाऱ्या या आंब्यांना पावसाळयात मोठ्या प्रमाणात मागणी असते. रत्नागिरी हापूस आंबा संपल्यानंतर जुलै महिन्यात हा आंबा बाजारात दाखल होतो.

उत्तर प्रदेशातील बनरास येथून चौसा आंबा, इलाहाबाद येथून लंगडा आंबा तर मालियाबाद येथून दशेरी आंबा पुण्यातील मार्केट यार्डात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने या आंब्याचा हंगाम असतो. सध्या बाजारात दररोज पाच किलोच्या साधारणतः १४००-१५०० बॉक्स तर १० किलोच्या १०००-१२०० लाकडी पेटी आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी सलिम बागवान यांनी दिली.

या आंब्याला शहरासह, उपनगरातून मागणी आहे. तसेच सातारा, बारामती, इंदापूर, बिगवान, हुबळी या ठिकाणावरून ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच हा आंबा पावसाळी असल्याने खराब नसतो व खाण्यास चांगला असल्याचे बागवान यांनी सांगितले.

किलो – भाव दर्जानुसार – पाच किलो बॉक्स – ४००-६०० – मोठी साईज . दहा किलो बॉक्स – ५००-७०० लहान साईज

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

मुंबईसह धारवीचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलं पुन्हा कौतुक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!