Share

जनसेवा करताना सावधान : नगरसेविकेला झाली कोरोनाची लागण

Published On: 

पुणे – सध्या कोरोनाचे संकट गंभीर होत असताना पुणे महापालिकेचे काही नगरसेवक नागरिकांना थेट मदत करतात. ही मदत अन्नधान्य किंवा इतर स्वरूपाची असते. बऱ्याचदा हे नगरसेवक नागरिकांना मदत करताना त्यांच्यामध्ये मिसळून जाऊन देत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.

पुणे शहरात कोरोनाने सध्या धुमाकूळ घातला आहे. मागील ९ दिवसांत कोरोनाचे पुण्यात दुप्पट रुग्ण झाले आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, दाटीवाटीने राहणाऱ्या भागांत हे संकट आणखी गडद होत चालले आहे.गोरगरीब नागरिकांना जेवण, अन्नधान्य वाटप करताना हे नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसह गर्दी करत आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी सावध करणारी आहे. पुण्यातील एका नगरसेविकेसह तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्या प्रभागांतील नागरिकांशी नियमितपणे संवाद राहावा, त्यांच्या समस्या सातत्याने सोडविण्यात यावे, यासाठी महापालिकेचे नगरसेवक २४  बाय ७ उपलब्ध असतात. शिवाय या नगरसेवकांच्या भोवती त्यांचे उत्साही कार्यकर्ते सातत्याने गर्दी करतात. आधी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तर आता थेट नगरसेवकांनाही आता कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यातील ही नगरसेविका आणि तिच्या मुलाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांनी सोशल डिस्टन्स पाळून, हाताला सॅनिटायजर, तोंडाला मास्क लावणे, कमी लोकांत मिसळणे गरजेचे झाले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!