पुणे : देशातील आयटी हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. परदेशी कंपन्यांमुळे हिंजवडी आयटी हबला अतिरेकी संघटनांपासून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवनांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आल्याने, हिंजवडी येथील आयटी हबची सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर कमांडर खेतान यांनी हिंजवडी इथे तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांची तातडीने बैठक घेतली. त्यांतर इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. हा अलर्ट थेट केंद्रीय सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आला असल्याने सुरक्षा अजूनच कडक करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

