Share

पीएसए ग्रुप भारतात वाहन उद्योगात पाय रोवण्यास सज्ज व्हेन्यू, सॉनेट आणि नेक्सॉनला देणार टक्कर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या कोरोना काळात मंदावलेला वाहन उद्योगाने जोर धरला आहे. तर आता प्रदूषण आणि वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांकडे काल वाढला आहे. तर प्रदूषण टाळण्यासाठी सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देखील देत आहे.

आता पीएसए ग्रुप भारतात वाहन उद्योगात पाय रोवण्यास सज्ज झाले आहे. पुढील महिन्यात सिट्रोजन सी 5 एअरक्रॉस एसयुव्ही ही नवी गाडी करणार असून प्रीमियम एसयुव्ही देशातील जीप कंपास आणि ह्युंदाई टक्सनला टक्कर देईल. सी 5 एअरक्रॉसनंतर, फ्रेंच कार निर्माता सिट्रोएन CC21 (कोडनेम) सब -4 मीटर SUV ही नवी कार किआ सॉनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती विटारा ब्रेझा या कारांना आव्हान देण्यासाठी बाजारात आणेल.

मीडिया रिपोर्टनुसार, CC21 कॉम्पॅक्ट SUV भारतीय रस्त्यावर धडक देईल. ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2021 मध्ये त्याचे उत्पादन सुरू होईल. सुरुवातीला सिट्रोन सीसी 21 मध्ये 100% स्थानिक 1.2 एल टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. यात ग्राहकांना एस्पिरेटेड, टर्बोचार्ज आणि टर्बोचार्ज्ड ऑटोमॅटिक अशी तीन व्हेरिएंट दिली जातील. कार निर्माताही नंतर याचे इलेक्ट्रिक व्हर्जनही बाजारात आणणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. फ्रेंच कार निर्माता पुढच्या वर्षी सिट्रोन सीसी 24 सह मिड एसयूव्ही बाजारात आणण्याची शक्यता आहे.

सीसी 24 चा सामना ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस यांच्याशी होईल, जे सध्या सेगमेंटवर राज्य करीत आहेत. एमजी झेडएस पेट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन, मारुती सुझुकी, टोयोटा, टाटा आणि महिंद्रा सारख्या कार उत्पादक कंपन्याही येत्या काही वर्षांत मध्यम आकाराच्या एसयुव्हीला लक्ष्य करू शकतात.

सिट्रॉन सीसी 26 हे देशातील फ्रेंच कार उत्पादकाचे तिसरे उत्पादन आहे. ही एक मध्यम आकाराची सेडान असेल जी होंडा सिटी, ह्युंदाई वर्ना आणि मारुती सुझुकी सियाझशी स्पर्धा करेल. मात्र सिट्रॉन कधी लॉन्च होईल याबाबत अद्याप माहित नाही. परंतु 2023-2024 पर्यंत कार शोरूममध्ये येऊ शकते. छोटी एसयुव्ही पीएसएच्या सीएमपी (कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वर तयार केली जाईल, ही कार एकाच उत्पादन लाईनवर कम्बशन आणि इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी अनुकूल केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!