Share

मोकाट कुत्र्यांसाठी पालिकेकडून १० लाख रुपयांची तरतुद

Published On: 

🕒 1 min read

जालना : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या फार वाढली आहे. प्रत्येक गल्ली-बोळात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने शहरवासीयांना याचा खूप त्रास होतोय. त्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशा स्वरूपाची मागणी नगरपालीकेला केली होती.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेने दहा लाखांची तरतूद करण्यात आली असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली. शहरात मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या अनेक तक्रारी नगरपालीकेकडे येत असतात. लहान मुलांपासून ते वृध्दांनाही कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची घटना घडल्या आहेत. त्यात नुतन वसाहत येथे मटन, चिकन व मच्छी मार्केट असल्याने येथे शेकडो मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असतो.

या मोकाट कुत्र्यांपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. त्यात नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेतही शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी सतत आवाज उठवला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नगरपालिकेने दहा लाखांची तरतूद केली आहे. यामुळे कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!