नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना कोरोनाची काही लक्षणे दिसत आहेत.त्यांना ताप आला होता, त्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यात, माजी मुख्यमंत्री कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी, अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता.
दरम्यान,दुसऱ्या बाजूला बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या गुरमीत राम रहीम याला देखील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीची तक्रार त्याने केल्यानंतर रविवारी रात्री रोहतकच्या सुनारिया तुरूंगातून येथे दाखल करण्यात आले. त्याची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजस्थानातील गेहलोत सरकार संकटात; पायलट गट भूकंप घडवण्याच्या तयारीत
- खुशखबर : ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी २२०० हून अधिक पदनिर्मितीस मान्यता
- मुंबईची झाली पुन्हा तुंबई; सखल भागात पाणी साचले,रेल्वे वाहतुकीवरही झाला परिणाम
- ‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार, त्यामुळे मोदींना पत्र लिहिण्याऐवजी पवारांना पत्र लिहा’
- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होणार भाजप-मनसे युती? भाजपच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

