Share

महाराष्ट्राचा अभिमान : लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : लष्करात पुरषांबरोबर महिलांनाही स्थान द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या लेकीला लष्करात उच्चपदावर पोहोचणाऱ्या पहिला महिला अधिकाऱ्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तळप्रमुखासारख्या नेतृत्वपदी महिलांच्या नियुक्तीची मार्ग मोकळा झाला होता. महिला लष्करी अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. लष्करामध्ये लिंगाधारित भेदभाव संपवण्यासाठी सरकारने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!