Share

अभिमानास्पद; सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये औरंगाबाद देशात १४ व्या तर राज्यात १० व्या क्रमांकावर

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये औरंगाबादने सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये देशात चौदावा तर राज्याच्या रँकींगमध्ये दहावा क्रमांक मिळविला आहे. शहरी विकास मंत्रालय भारत सरकारमार्फत १९ नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहरांमध्ये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू करण्यात आले आहे.

मलनिस्सारण वाहिनी, सेप्टीक टँक व मॅनहोल मध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करून घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा होता. औरंगाबाद महानगरपालिकेने मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Astik kumar pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात साफसफाई कर्मचाऱ्यांना ६ जानेवारी २०२१ मध्ये प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणानंतर जीवित हाणी टाळण्यासाठी मलनिस्सारण वाहिनी, सेप्टीक टँक व मॅनहोल मध्ये मानवी वापर कमी करून यांत्रिकीकरणाच्या साफसफाईला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला.

११ लाख ७५ हजार ११६ लोकसंख्या असणाऱ्या मनपा क्षेत्रात येणाऱ्या ११५ वॉर्डांमधील नाल्याची साफसफाई करणाऱ्या सर्व कामगारांनी हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट्स आणि इतर वैयक्तिक संरक्षक उपकरणे सेफ्टी गियर मशिनद्वारे करण्यात आली.  याचा सकारात्मक परिणाम नुकत्याच जाहीर झालेल्या निकालावरून दिसून आला आहे. राष्ट्रीय रँकींगमध्ये औरंगाबादने चौदावा तर राज्य रँकींगमध्ये दहावा क्रमांक सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये पटकाविला आहे. आस्तिक कुमार पांडेय(Astik kumar pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द कामकाज केल्याने यशाचे हे शिखर गाठण्यात यश मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!