Share

अडचणी वाढणार? ; एनआयएने घेतले प्रदीप शर्मांसह इतर आरोपींचे डीएनए नमुने

Published On: 

मुंबई : अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सध्या रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा अटकेत असलेल्या सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर आणखी दोघा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान आज मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने अटक केलेले प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींचे डीएनए नमुने आज जमा करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए टेस्ट करुन पाहिले जाणार आहेत. डीएनए टेस्टसाठी एक टीम एनआयए कार्यालयात दाखल झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसुख यांच्या हत्येमागे प्रदीप शर्मा मास्टरमाइंड होता. एनआयएकडून अटकेत असलेले विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव प्रदीप शर्माची माणसं होती.

प्रदीप शर्माच्या म्हणण्यावर त्यांनी मनसुख हिरणची हत्या करून त्याची बॉडी डीसपोज केली होती. प्रदीप शर्मा याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा मनसुख हिरण मृत्यू प्रकरण आणि स्पोटक प्रकरण तापलं आहे. येणाऱ्या दिवसात यामध्ये अजून बडे खुलासे आणि मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने २८ जून पर्यंत NIA कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!