🕒 1 min read
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांना गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मंत्रालयाने एका महिन्याच्या आत बंगला खाली करण्यास सांगितलं आहे. या नोटिसमध्ये प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्टपर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे.
भारताने 59 चायना अॅपवर बंदी घातल्यानंतर अमेरिका सरकारची पहिली प्रतिक्रिया…
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार यांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रात, प्रियंका वाड्रा यांना आता एसपीजी सुरक्षा नसल्याने त्या राहत असलेला दिल्लीतील लोधी रोडवरील बंगला रिकामा करावा. असं म्हटलं आहे.
Congress leader Priyanka Gandhi Vadra asked to vacate government allotted accommodation within one month, by Ministry of Housing and Urban Affairs. pic.twitter.com/YPIJqGBIds
— ANI (@ANI) July 1, 2020
मागील वर्षी प्रियंका वाड्रा यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.
सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – अशोक चव्हाण
दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आता उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील. त्या लखनऊमधील बंगल्यात राहतील. उत्तर प्रदेश राज्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका आता लखनऊमध्ये राहण्याबाबत तयारी करत आहेत. त्या लखनऊमधील ‘कौल हाऊस’ मध्ये शिफ्ट होतील, अशी शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
