Share

‘प्रिया वारियर’ च्या गाण्यामुळे दुखावल्या मुस्लिमांच्या भावना? हैदराबादमध्ये तक्रार

Published On: 

हैदराबाद : यूट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया वारियर हि काही क्षणातच लोकप्रिय झाली. प्रिया वारियर काम करत असलेल्या ‘उरू अदार लव्ह’या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार काही मुस्लिम युवकांनी केली आहे.

priya v1

हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियर आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रारीत प्रियाविरोधात कोणतेही आरोप नाहीत. एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. हैदराबादमध्ये मुस्लिम युवकांचा समुहाने प्रिया आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘मणिक्या मलराया पूर्वी’ या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.

priya

कोण आहे प्रिया वारियर?

प्रिया प्रकाश वारियर. ही दक्षिण भारतातली अभिनेत्री आहे. प्रिया अवघी १८ वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार हे गाणं आहे मल्ल्याळम सिनेमा ‘ओरु अदार लव्ह’ मधलं. या गाण्याचे बोल आहेत ‘मनिक्या मलराया पूवी’. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. शिवाय प्रियाच्या काही क्यूट एक्सप्रेशन्सची चर्चा थांबता थांबत नाही आहे. तिच्या डोळ्यांच्या खूणा आणि त्यावर घायाळ होणारे अनेक जण सोशल मीडियावर गाण्याचं फारच कौतुक करतायेत. या गाण्याने बघता बघता ४५ लाखांच्यावर व्ह्युज मिळवले आहेत. योगायोग व्हॅलेंटाईन्स डे सुरु असल्यामुळे या व्हिडिओ तरुणांनी डोक्यावर घेतले आहे.

पहा प्रिया वारियर चा नवीन व्हिडीओ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!