Share

संतापजनक : सातत्याने सूचना व आदेश देऊन देखील बंद आहेत खाजगी ‘नर्सिंग होम’, हॉस्पिटल्स व खाजगी दवाखाने

Published On: 

मुंबई : ‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेद्वारे यापूर्वी वारंवार देण्यात आले आहेत. मात्र, असे असूनही अनेक ठिकाणी अद्याप काही नर्सिंग होम, हॉस्पिटल व खाजगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे.

नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जी खाजगी ‘नर्सिंग होम’ (शुश्रुषा गृह, polyclinic इत्यादी), खाजगी रुग्णालये वा खाजगी दवाखाने अद्याप सुरू झालेले नसतील, त्यांच्यावर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी आज विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर जी खाजगी रुग्णालये – नर्सिंग होम – दवाखाने सुरू होतील, त्यांना महापालिकेत द्वारे ‘पी. पी. ई. किट’ देण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये महापालिका क्षेत्रातील जे खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम, खाजगी दवाखाने बंद आढळून आले, त्यांना प्रथम सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर याबाबत वारंवार सूचना व नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. नोटीस देण्याच्या कार्यवाहीनंतर महापालिका क्षेत्रातील काही खाजगी नर्सिंग होम, खाजगी रुग्णालये व काही खाजगी दवाखाने सुरू झाली. यानुसार सुरू झालेल्या खाजगी रुग्णालयांना किंवा खाजगी दवाखान्यांना महापालिकेद्वारे ‘पी.पी.ई. किट’ देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. तथापि, वारंवार सूचना व नोटीस देऊन देखील काही खाजगी रुग्णालय व खाजगी दवाखाने अद्यापही बंद असल्याचे आढळून येत आहे. ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा झाल्याचा वळसे पाटील यांचा दावा

नागरिकांची गरज आणि परिस्थिती लक्षात न घेता बंद ठेवण्यात येत असलेल्या या खाजगी रुग्णालयांवर व खाजगी दवाखान्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आज महापालिका आयुक्तांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रातील बंद असलेली खाजगी रुग्णालये, खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने यांची यादी करावी व त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर महापालिकेच्या सूचनेनुसार जी खाजगी रुग्णालये, खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने सुरू झाली आहेत किंवा सुरू होतील, त्यांना यापूर्वीच निश्चित केल्यानुसार आवश्यक त्या प्रमाणात ‘पी. पी. ई. किट’ उपलब्ध करून देण्यात येतील; या आपल्या भूमिकेचा महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान पुनरुच्चार केला.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने प्रशासनाला माहिती द्यावी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!