Share

बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा झाल्याचा वळसे पाटील यांचा दावा

Published On: 

मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रात देखील भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कामगारांवर बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. अश्या परिस्थितीत या कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

कोविड – १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णयराज्य शासनाने घेतला होता. यानुसार ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा झाल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.

पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना

वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्य शासनाच्या निर्णयानुसार दि. २० मे २०२० पर्यंत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ७,६७,००० नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांच्याखात्यात प्रत्येकी रू. २०००/- प्रमाणे १५३ कोटी ४० लक्ष एवढे अर्थसहाय्य जमा करण्यात आलेले आहे.

लॉकडाऊन कालावधीतील विविध अडचणीमुळे ज्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्याचा तपशील जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झालेला नाही तोही प्राप्त करून त्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यातही अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात येईल असं वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

निर्देशांचे पालन केले नाही तर कारवाईसाठी तयार रहा, मुंढेंचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!